FAQ's Nageshwar

प्र.1) नागेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे?
औंढा नागनाथ म्हणून ओळखले जाणारे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र येथे स्थित आहे.
प्र.2) नागेश्वर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध का आहे?
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या बारा पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे आणि शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानले जात असल्यामुळे प्रसिद्ध आहे.
प्र.3) दर्शनासाठी किती वेळ लागतो?
सामान्य दिवसांत ३० ते ६० मिनिटे लागतात. सणासुदीच्या काळात अधिक वेळ लागू शकतो.
प्र.4)नागेश्वर मंदिर दर्शन वेळा काय आहे?
मंदिर सकाळी ५:३० ते रात्री ९:०० पर्यंत खुले असते.
प्र.5) नागेश्वर ज्योतिर्लिंग अभिषेकाची वेळ?
सकाळी ५:३० ते दुपारी १२ पर्यंत अभिषेक होतो.
प्र.6) गर्दी कधी असते?
श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सप्ताहअखेर मोठी गर्दी असते.
प्र.7) नागेश्वर मंदिराचा इतिहास काय आहे ?
नागेश्वर मंदिर इतिहास - ज्योतिर्लिंगाची कथा शिवपुराणात वर्णन केलेली आहे, ज्यामध्ये भगवान शिवांनी आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी नागेश्वर रूप धारण केले. त्यामुळे नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ज्योतिर्लिंग मानले जाते.
प्र.8)नागेश्वर मंदिरात मोबाईल चालतो का?
नाही, मंदिरात मोबाईल वापरण्यास मनाई आहे.
प्र.9) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभिषेकाची दक्षिणा काय आहे?
नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभिषेक पूजेची दक्षिणा ही पूजेच्या प्रकारानुसार वेगवेगळी असते आणि त्याची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर रुद्राभिषेक पूजा , जलाभिषेक पूजा, दुधाभिषेक पूजा, लघुरुद्राभिषेक पूजा व रुद्रसूक्त अभिषेक पूजा या पेज वर उपलब्ध असते.
प्र.10) नागेश्वर मंदिर कसे जायचे?
नागेश्वर मंदिर महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ येथे असून येथे रस्त्याने, रेल्वेने आणि जवळच्या शहरांतून सहज पोहोचता येते.
प्र.11) महाराष्ट्रातील इतर ज्योतिर्लिंग कोणते ?
त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ.
प्र.12)नागेश्वर येथे शिवलिंगाला स्पर्श करता येतो का?
पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली / अभिषेकावेळी स्पर्श करता येतो.
प्र.13) नागेश्वर मंदिरात अभिषेक करण्याचे फायदे काय आहेत ?
शांती, आरोग्य आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.
प्र.14) नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दुसरे नाव काय ?
नागेश्वर ज्योतिर्लिंगचे दुसरे नाव औंढा नागनाथ आहे.
प्र.15) नागेश्वर नाव का?
सर्पविषापासून रक्षण करणारा म्हणून यास नागेश्वर म्हणतात.
प्र.16) नागेश्वर मंदिरात ऑनलाइन पूजा कशी बुक करावी?
नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे पूजा करण्यासाठी भाविक आमच्या वेबसाइटवर जाऊन बुक पूजा पर्यायावर क्लिक करून इच्छित पूजा आणि तारीख निवडू शकतात. त्यानंतर गुरुजींची उपलब्धता पाहून पूजा आरक्षित करता येते.
प्र.17) नागेश्वर मंदिरात पूजा / दर्शन करण्याची उत्तम वेळ कोणती ?
सकाळची वेळ व श्रावण महिना दर्शनासाठी उत्तम मानला जातो.
प्र.18) नागेश्वर ज्योतिर्लिंग हे कितवे ज्योतिर्लिंग आहे ?
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे ८ वे ज्योतिर्लिंग आहे.
प्र.19) नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे का?
होय, महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात स्थित आहे.
प्र.20) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे रुद्राभिषेक पूजा का केली जाते?
नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे रुद्राभिषेक पूजा ही भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी केली जाणारी अत्यंत पवित्र शिवपूजा मानली जाते. या अभिषेकामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि भक्तांना शांती, समृद्धी व शिवकृपा प्राप्त होते.
प्र.21) नागेश्वर मंदिरात रुद्राभिषेक पूजा कशी आरक्षित करावी?
भाविक नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे रुद्राभिषेक पूजा आरक्षण करण्यासाठी आमच्या संकेतस्थळावर जाऊन बुक पूजा पर्यायाद्वारे गुरुजींना आरक्षित करू शकतात. अनुभवी मंदिरातील गुरुजी वैदिक पद्धतीने ही पूजा संपन्न करतात.
प्र.22)नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे जलाभिषेक पूजा करण्याचे महत्त्व काय आहे?
नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे जलाभिषेक पूजा करताना शिवलिंगावर पवित्र जल अर्पण केले जाते. या पूजेने भक्तांच्या पापांचा नाश होतो आणि जीवनात शांती व आध्यात्मिक उन्नती मिळते.
प्र.23) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे दुधाभिषेक पूजा का केली जाते?
दुधाभिषेक पूजा मध्ये शिवलिंगावर पवित्र दूध अर्पण केले जाते आणि ही पूजा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानली जाते. या पूजेने आरोग्य, सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद मिळतो.
प्र.24) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे लघु रुद्राभिषेक पूजा म्हणजे काय?
लघुरुद्राभिषेक पूजा मध्ये शिवलिंगावर पवित्र दूध अर्पण केले जाते आणि ही पूजा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानली जाते. या पूजेने आरोग्य, सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद मिळतो.
प्र.25) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे रुद्रसूक्त अभिषेक पूजा करण्याचे महत्त्व काय आहे?
रुद्रसूक्त अभिषेक पूजा ही वैदिक रुद्रसूक्त मंत्रांच्या पवित्र उच्चारांसह केली जाणारी शक्तिशाली शिवपूजा आहे. या पूजेने भक्तांना आध्यात्मिक शांती मिळते आणि भगवान शिवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
प्र.26) नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभिषेक करतांना काय कपडे घालावे ?
नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभिषेक करताना भाविकांनी पारंपरिक व साधे कपडे घालावेत, पुरुषांनी साधारणतः फक्त धोतर परिधान करावे (शर्ट घालू नये) आणि महिलांनी साडी किंवा पारंपरिक भारतीय वेश परिधान करावा.

© 2025 Nageshwar Services. All rights reserved.Privacy Policy & Terms and Conditions Designed & Developed by Nageshwar Services .